काबूल (अफगाणिस्तान) – तालिबाच्या राजवटीत संपूर्ण अफगाणिस्तानात आता शिखांची केवळ २० कुटुंबे शेष आहेत, अशी माहिती शीख समाजाच्या नेत्यांनी दिली. शिखांचे अस्तित्व आता अफगाणिस्तानाची राजधानी काबूल आणि जलालाबाद या दोन शहरांपुरतेच राहिले असून तेथे एकूण १४० ते १५० शीख रहातात, असेही त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानमध्ये आतंकवाद्यांनी नुकतेच गुरुद्वाराला लक्ष्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर शीख नेत्यांनी ही माहिती दिली. अफगाणिस्तानमध्ये मागील वर्षी तालिबानची राजवट आल्यापासून तेथील अल्पसंख्यांकांवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. यासह वर्ष २०२०, २०२१ आणि २०२२ अशी सलग ३ वर्षे विविध गुरुद्वारांवर आक्रमणे करण्यात आली आहेत.
संपादकीय भूमिकाभारतात मुसलमानांवर कथित अन्याय झाल्यावर त्याविषयी अहवाल प्रकाशित करून भारताला खलनायक ठरवणारी अमेरिका आता अफगाणिस्तानमधून शीख नामशेष होत असतांना चकार शब्दही का काढत नाही ? असे भारताने अफगाणिस्तानला ठणकावून विचारले पाहिजे ! |