राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून पुन्हा चौकशी  

नवी देहली – काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची २० जून या दिवशी पुन्हा एकदा नॅशनल हेराल्ड नियतकालिकातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) चौकशी केली. यापूर्वी राहुल गांधी यांची ईडीकडून ३ दिवसांत ३० घंटे चौकशी करण्यात आली होती.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा हेही आरोपी आहेत. यांतील दोन आरोपी ऑस्कर फर्नांडिस आणि मोतीलाल व्होरा यांचे निधन झाले आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांच्या चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देहलीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले. या वेळी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, सलमान खुर्शीद, के. सुरेश, व्ही. नारायणसामी आदी उपस्थित होते.