युवकांनो, पुरोगाम्यांच्या बुद्धीभेदाला बळी पडू नका !

सुसंस्कारित आणि सक्षम युवक हेच देशाचे धन !

समाजजीवनाच्या दृष्टीने हिंदु धर्म प्रतिगामी आहे, असे पुष्कळ क्रांतीकारक आणि समाजसुधारक यांचे मत होते. पुरोगाम्यांनी हिंदुद्वेष आणि स्वार्थ यासाठी हा प्रसार चालू ठेवला आहे. प्रत्यक्षात हिंदु धर्म हा समाजविरोधी नसून संपूर्ण विश्वाचा विचार करणारा आहे. केवळ मानवाचा नव्हे, तर सकल प्राणीमात्रांचा विचार करणारा व्यापक धर्म आहे. धर्मनिष्ठ महापुरुषांनी साधनेच्या बळावरच जगामध्ये उदात्ततेचे आदर्श वेळोवेळी निर्माण केले आहेत आणि त्या आदर्शांकडे जाण्याचे आवाहन समाजमनाला केले आहे. अंनिससारख्या नास्तिक आणि धर्मविरोधी संस्था धर्माचरणातील कृती पर्यावरणविरोधी असल्याचे धादांत खोटे थोतांड निर्माण करून आणि ‘धर्माचरण न करता दान करा’ असा प्रसार करून समाजाला धर्माचरणापासून परावृत्त करत आहेत. धर्मशास्त्र समजून घेतले, तर हे पुरोगाम्यांचे हे हिंदुद्वेषापोटी रचलेले कुभांड सहज लक्षात येते. त्यासाठी धर्माचरणाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.

(संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)