ऑस्ट्रेलियातील विश्‍वविद्यालयात ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट दाखवण्यास मुसलमानांचा विरोध

हिंदू विद्यार्थ्यांना धमकी

सिडनी (ऑस्टेलिया) – येथील न्यू साऊथ वेल्स विश्‍वविद्यालय (यु.एन्.एस्.डब्लू.) येथे शिकणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांचा गेल्या २ आठवड्यांपासून छळ करण्यात येत आहे. या विश्‍वविद्यालयातील हिंदु सोसायटीच्या सदस्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट दाखवण्याचे आयोजन केले होते. यावर या विश्‍वविद्यालयातील ‘मुस्लिम स्टुडंट्स असोसिएशन’च्या विद्यार्थांनी त्यांना धमकी देऊन त्यांचा छळ चालू केला आहे.

१. या विरोधामुळे हिंदूंनी ‘मुस्लिम स्टुडंट्स असोसिएशन’च्या विद्यार्थांसमवेत एक बैठक आयोजित करून चर्चा केली. त्या वेळी मुसलमान विद्यार्थ्यांनी हिंदूंना धमकी दिली. बैठकीत असोसिएशनचे प्रवक्ते उस्मान महमूद म्हणाले की, तुम्ही स्वतःहून चित्रपट दाखवण्याचे रहित केले, तर चांगलेच आहे. आम्ही त्याचे कौतुकही करू; मात्र जर तुम्ही तसे केले नाही, तर आम्ही तुमच्या विरोधात कृती करू आणि ही कृती प्रेमाची नसेल.

२. या वेळी उस्मान यांनी ऑस्ट्रेलियातील काही खासदार, पत्रकार आदींची नावे घेतली आणि ते त्यांना साहाय्य करतील, असे सांगितले. या वेळी ते काश्मीरमध्ये किती हिंदूंना मारले आणि किती जणांचा छळ झाला, याची आकडेवारी मागत होते.

संपादकीय भूमिका

जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरी मुसलमान त्यांच्या हिंसाचारी धर्मबांधवांचा बचाव करण्यासाठी नेहमीच पुढे असतात, हे लक्षात घ्या !