धनाच्या आधारे नव्हे, तर भाव असलेल्यांना देवतेचे दर्शन मिळायला हवे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

मंदिरात येणाऱ्या अर्पणाचा विनियोग करण्याची व्यवस्था पारदर्शक हवी. मंदिरातील धनाचा उपयोग धर्मप्रचारासाठी व्हायला हवा. मंदिरांद्वारे वेदपाठशाळा चालवल्या जाव्यात. मंदिरांमध्ये ग्रंथालय असायला हवे. त्याद्वारे मंदिराचा इतिहास, तसेच आपल्या हिंदु संस्कृतीची माहिती द्यायला हवी. काही मंदिरांमध्ये दर्शनासाठी शुल्क आकारले जाते. धनाच्या आधारे नव्हे, तर भाव असलेल्यांना देवतेचे दर्शन मिळायला हवे.