राष्ट्राचा कळस असलेला आणि आकाशात डौलाने फडकणार्‍या राष्ट्रध्वजाला नम्रतापूर्वक दोन्ही हात जोडून नमस्कार करायला हवा !

पुष्पांजली पाटणकर

‘२६ जानेवारीचा अंक हाती आला. आपल्या तिरंग्याला ‘सॅल्यूट’ करायला तो का ‘युनियन जॅक’ आहे ? देवाने दोन हात कशाला दिलेत ? मंदिराच्या कळसाला आपण दोन्ही हात जोडून नमस्कार करतो ना ? ध्वज हा राष्ट्राचा कळसच आहे. आकाशात डौलाने फडकणारा. कळसाच्या मागे विशाल आभाळ असते. ध्वजाच्या वरही  विशाल आकाश असते. जे जे महान असते, त्यावर आकाशाचे छत्र असते. आपल्या ध्वजाला मोठा मान आहे. त्याला नम्रतापूर्वक दोन्ही हात जोडून नमस्कार करायला हवा. हा ध्वज जगाला अभिमानाने सांगतो ना, ‘मी भारताचा आहे. मी हिंदु राष्ट्राचा प्राण आहे.’

– पुष्पांजली (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७४ वर्षे), बेळगाव(२६.१.२०२०)