आणंद (गुजरात) येथे मंदिराच्या शेजारच्या भूमीवर धर्मांधांनी केलेल्या दाव्याला विरोध झाल्यावर हिंसाचार

आणंद (गुजरात) – येथील बोरसद गावातील ब्राह्मणवाडा मोहल्ल्यामध्ये एका मंदिराच्या शेजारी असलेल्या वादग्रस्त भूमीवर मालकी सांगून तेथे विटा आणून ठेवल्याच्या प्रकरणी धर्मांधांनी केलेल्या हिंसाचारात ४ जण घायाळ झाले. यात एका पोलीस शिपायावर चाकूने आक्रमण करण्यात आल्याने तो गंभीररित्या घायाळ झाला. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रथम अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि नंतर रबरी गोळ्यांद्वारे गोळीबार केला.

संपादकीय भूमिका

अशांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते सातत्याने कायदा हातात घेतात आणि वित्त अन् जीवित हानी करतात, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !