पुलवामामध्ये ३ आतंकवादी ठार

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथे ११ जूनपासून चालू झालेली चकमक १२ जूनला सकाळी संपली. यात सुरक्षादलांनी ३ आतंकवाद्यांना ठार केले. घटनास्थळावरून २ ‘एके-४७’ रायफली, एक पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. पुलवामाच्या द्रबगाम भागात २-३ आतंकवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी या परिसराला वेढा घातला. त्यानंतर ही चकमक झाली. मारले गेलेले सर्व आतंकवादी स्थानिक, तसेच लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेशी संबंधित होते.