वर्ष २०१९ चे ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आरंभ होण्याच्या आधीच्या सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘या वर्षी अधिवेशन आणि साधना शिबिर पुष्कळ आध्यात्मिक स्तरावर असणार आहे आणि त्याची फलनिष्पत्तीही पुष्कळ अधिक, म्हणजे आधीच्या सर्व अधिवेशनांच्या तुलनेत अधिक असणार आहे. यात सहभागी होणाऱ्या साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली होणार आहे. देव त्यांचे प्रारब्धही अल्प करणार आहे.’’
हे ऐकल्यावर मला उत्साह वाटला; पण नेमकी ‘काय प्रक्रिया असेल ?’, ते माझ्या अल्प बुद्धीला समजले नाही. अधिवेशनाच्या काळात मला स्वतःत जाणवलेला लक्षणीय पालट येथे देत आहे.
‘हे गुरुदेवा, माझ्या अल्प बुद्धीला जे जाणवले, ते यात टिपले आहे. हे तुमच्याच चरणी अर्पण करते.’
– कु. प्रणिता सुखटणकर, केरळ (१६.६.२०१९)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |