राजधानीत सिगारेटसाठी पैसे न दिल्याने अल्पवयीन मुलाची हत्या !

नवी देहली – सिगारेटसाठी १० रुपये न दिल्याने एका अल्पवयीन मुलाची भरदिवसा चाकू भोसकून हत्या करण्यात आली. नवी देहलीतील आनंद पर्वत परिसरात ही घटना घडली असून मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने सर्व आरोपींना अटक करण्यात आली. चारही आरोपींनी कृत्याची स्वीकृती दिली आहे.

 गुन्ह्यांच्या संख्येत तब्बल ३२८ टक्क्यांनी वाढ !

 समाज धर्महीन झाल्यानेच गुन्हेगारीत वाढ झाली, हे लक्षात घ्या !

गेल्या वर्षी १५ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या देहली पोलिसांच्या अहवालानुसार राजधानीत गेल्या दशकात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या तब्बल ३२८ टक्क्यांनी वाढली. वर्ष २०११ मध्ये येथे भा.दं.वि. अंतर्गत एकूण ५३ सहस्र ३५३ गुन्हे प्रविष्ट करण्यात आले होते. वर्ष २०२१ मध्ये हा आकडा एक लाख ७५ सहस्र ३२७ वर पोचला आहे.

संपादकीय भूमिका

राजधानीत असे प्रकार घडत असतील, तर अन्य ठिकाणचा विचारही न केलेला बरा !