वयस्कर असूनही स्वावलंबी असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंदाकिनी विनायकराव चौधरी (वय ८५ वर्षे)

१. स्वयंशिस्त

श्रीमती मंदाकिनी चौधरी

आजी नेहमी सकाळी नियोजित वेळेत उठतात. त्या अतिशय व्यवस्थित रहातात. त्या पूर्वापार चालत आलेल्या रूढी आणि परंपरा यांचे अत्यंत मनापासून अन् आदराने पालन करतात. त्या नेहमी डोक्यावर पदर घेतात.

२. स्वावलंबी असणे

सौ. कीर्ती जाधव

आजींचे वय ८५ वर्षांचे असूनही त्या कुणाचेही साहाय्य न घेता स्वतःचे कपडे स्वतः धुतात, भांडी घासतात आणि स्वतःचे सर्व वैयक्तिक आवरतात. त्या त्यांचे सर्व आवरून मलाही कामात साहाय्य करतात.

३. त्या सर्व कामे करत असूनही त्यांच्यामध्ये कर्तेपणा जाणवत नाही.

४. त्यांना कुणाकडून कोणत्याही अपेक्षा नसतात.

५. त्या माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने पुष्कळ मोठ्या असूनही त्यांनी मला कधीच कोणतीही गोष्ट अधिकारवाणीने सांगितली किंवा शिकवली नाही.

६. भाव

अ. आजी देवपूजा अत्यंत शांतपणे आणि भावपूर्ण करतात.

आ. त्यांना आश्रमात रहायला पुष्कळ आवडते. त्या सतत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्यासाठी किती करतात ! त्यांनी सर्व किती छान केले आहे !’, या जाणिवेने कृतज्ञताभावात असतात. त्यामुळे त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी वेगवेगळ्या ओव्या सुचतात. या ओव्यांमधून कृतज्ञता व्यक्त होऊन त्यांच्यातील भोळ्या भावाचे दर्शन होते.

७. आजींमध्ये जाणवलेले पालट

अ. आजींचे वय ८५ वर्षे आहे; परंतु त्यांच्याकडे पाहिल्यावर त्या इतक्या वयस्कर आहेत, असे वाटत नाही.

आ. त्या घरी असतांना किंवा अन्यत्रही अनावश्यक बोलत नाहीत.

इ. ‘मागील काही मासांपासून आजी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सतत अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवते.

ई. त्यांचे मन अत्यंत शांत आणि स्थिर झाले असून त्यांच्या सहवासातही याची अनुभूती येते. मला आजींचा सहवास हवाहवासा वाटतो.

उ. ‘आजी स्थुलातून आमच्या समवेत असल्या, तरी त्यांचे मन आमच्या समवेत नसून ते जलद गतीने भगवंताकडे जात आहे’, असे जाणवते.

– सौ. कीर्ती प्रतीक जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (चौधरीआजींची नातसून) (१६.१२.२०२१)