परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
भगवंताच्या कृपेने कोरोनासारख्या घोर आपत्काळातही मला गुरुदेवांचा ७९ व्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहाता आला. या संपूर्ण सोहळ्यात माझी सतत भावजागृती होत होती. या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) करत होते. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. गुरुदेवांना श्रीविष्ष्णूच्या रूपात पाहून
१ अ. ‘विनायकदादा श्रीविष्णूची स्तुती करणारे नारदमुनी आहेत’, असे मला जाणवत होते.
१ आ. ‘स्वतः वैकुंठात आहे’, असे वाटणे : ‘मी साक्षात् वैकुंठात आहे’, असे मला वाटत होते. श्रीविष्णुरूपात असलेल्या गुरुदेवांना पाहून, तसेच सोहळा होत असलेले ठिकाण बघून ‘गुरुदेवांनी वैकुंठलोक पृथ्वीवर आणला आहे’, असे मला वाटत होते.
१ इ. श्रीविष्णूच्या रूपात अवतरित झालेले श्री गुरु सिंहासनावर बसल्यावर आमच्या घराच्या जवळ विजेच्या गडगडाटासह पाऊस चालू झाला. जणू काही ‘वरुणराजाने गुरुदेवांचे स्वागत केले’, असे मला जाणवले.
१ ई. मला बाहेरील वातावरणात चैतन्य जाणवत होते.
१ उ. श्रीविष्णूवर आधारित गीत ऐकतांना : सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) श्रीविष्णूवर आधारित गीत गात होत्या. ‘त्या वेळी आनंदाच्या लाटा येत आहेत’, असे मला जाणवले.
१ ऊ. तबलावादन ऐकतांना : तबलावादन करणारे श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांच्याकडे पाहून त्यांच्यातील भाव जाणवत होता. त्यांच्या ‘तबल्यातून पांढरा प्रकाश येत आहे’, असे मला जाणवले.
१ ए. ‘गुरुदेवांच्या देहातून पिवळा प्रकाश सर्व साधकांपर्यंत येत आहे’, असे मला जाणवले.
१ ऐ. कु. प्रिशा सभरवाल श्रीविष्णूवर आधारित गीतावर नृत्य करतांना ‘निळा प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे : कु. प्रिशा सभरवाल (आध्यात्मिक पातळी ५८ टक्के, वय १५ वर्षे) श्रीविष्णूवर आधारित गीतावर नृत्य करत असतांना ‘तिच्या नृत्यातून सकारात्मक ऊर्जा आणि निळा प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
२. डोलोत्सव होतांना
श्री गुरुदेव झोपाळ्यावर बसले असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ त्यांना झोका देत होत्या. ते पाहून माझी पुष्कळ भावजागृती होत होती. त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे मला जाणवत होते. ते बघून माझे मन पुष्कळ आनंदी झाले. ‘हा सोहळा संपूच नये’, असे मला वाटले.
३. श्रीरामराज्याभिषेक सोहळा चालू असतांना
३ अ. ‘सृष्टीही हा सोहळा पहाण्यासाठी आतुर झाली आहे’, असे वाटणे : श्रीरामराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी श्री गुरुदेव श्रीरामरूपात राज्याभिषेकासाठी आले. त्या वेळी आमच्या घराच्या जवळ विजेचा मोठा कडकडाट झाला. तेव्हा ‘सृष्टीही हा सोहळा पहाण्यासाठी आतुर झाली आहे. सृष्टीलाही हा सोहळा पाहून आनंद झाला आहे’, याची मला प्रचीती आली.
३ आ. गुरुदेवांचे (श्रीरामाचे) मनोहारी रूप सतत डोळ्यांसमोर येणे : श्रीरामराज्याभिषेक चालू झाल्यावर श्रीरामाने (गुरुदेवांनी) मुकुट धारण केला. त्या वेळी ‘साक्षात् अयोध्यानगरी रामनाथी आश्रमात अवतरली आहे’, असे मला जाणवले. गुरुदेव खरोखर श्रीरामासम दिसत होते. गुरुदेवांचे (श्रीरामाचे) मनोहारी रूप बराच वेळ माझ्या डोळ्यांसमोरून हलत नव्हते.
३ इ. कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी गायन करत असतांना ‘त्यांच्या गायनातून आनंदाच्या लहरी येत आहेत’, असे जाणवले.
३ ई. ‘गुरुदेवांच्या देहातून जांभळा प्रकाश संपूर्ण ब्रह्मांडात प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
३ उ. कु. प्रिशा सभरवाल श्रीरामावर आधारित गीतावर नृत्य करत असतांना ‘अयोध्येत श्रीरामाच्या राजदरबारातच नृत्य होत आहे’, असे जाणवणे : कु. प्रिशा सभरवाल श्रीरामावर आधारित गीतावर नृत्य करत असतांना ‘साक्षात् त्रेतायुगात अयोध्येत श्रीरामाच्या राजदरबारातच नृत्य होत आहे’, असे मला जाणवले. ‘तिच्यातून पिवळा प्रकाश येत आहे आणि तो संपूर्ण ब्रह्मांडात जात आहे’, असे मला जाणवले. ती नृत्य करतांना मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले. ‘पाताळातील अनिष्ट शक्ती तिच्यावर विविध शक्ती प्रक्षेपित करत होत्या; पण गुरुदेवांच्या कृपेने, तसेच नृत्य करत असतांना तिच्या हालचालींतून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्यामुळे त्या शक्ती नष्ट होत होत्या. प्रिशाच्या नृत्यातून प्रक्षेपित होणारी चैतन्यरूपी शक्ती पाताळात जाऊन अनिष्ट शक्तींना नाहीसे करत होती.’
४. कृतज्ञता
हा सोहळा ‘न भूतो न भविष्यति’ असा झाला. कोरोनासारख्या भयंकर आपत्काळात गुरुदेवांच्या कृपेने हा सोहळा पहायला मिळाला आणि अनुभूती आल्या, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री. पार्थ लोखंडे (वय २२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (मे २०२१)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |