बेंगळुरू (कर्नाटक) – येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने परदेशातून आलेल्या महिलांकडून ५०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले. या प्रकरणी ८ विदेशी महिला आणि अन्य एक अशा ९ जणांना अटक केली आहे. झिम्बाब्वेहून बेंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळ मार्गे देहलीला हेरॉईन नेले जात होते.