पुण्यात ७ लाख ७३ सहस्रांची बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त !

अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई

पुणे – विनापरवाना बनावट सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन करणार्‍या वाकडमधील दत्त मंदिराजवळील मे. ग्रूमिंग एन्टरप्रायझेस प्रा.लि. येथून २४ मे या दिवशी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ७ लाख ७३ सहस्र रुपयांचा साठा जप्त केला आहे. आस्थापनाने विनापरवाना बनावट शाम्पू, कंडिशनर, बिअर्ड वॉश, हेअर ट्रीटमेंट आणि विविध केरेटीनयुक्त सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन करून विक्री केल्याचे अन्वेषणात उघडकीस आले आहे. (बनावट सौंदर्यप्रसाधने विकून ग्राहकांच्या जिवाशी खेळणार्‍या विक्रेत्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक) सौंदर्यप्रसाधने खरेदी करणार्‍या ग्राहकांनीही वस्तूवर उत्पादन परवाना नमूद असल्याची निश्चिती करावी. वस्तूची खरेदी देयकाद्वारे करण्याचे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.