ज्ञानवापीचा धडा : हिंदू एकतेची आवश्यकता !

दक्षिण आफ्रिकेमधील वास्तव्यात म. गांधींना एकदा स्थानिक गुंडांच्या एका टोळक्याने भर रस्त्यात ‘या रस्त्यावर काळ्या लोकांना चालण्याचा अधिकार नाही’, असे म्हणत वाईट भाषेत अपमानित केले होते. हा प्रसंग कसातरी निभावला; पण यावर गांधींची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती. ते त्यांच्यासह असलेल्या मित्राला म्हणाले, ‘‘मला कळत नाही, एखाद्या व्यक्तीचा अपमान हा दुसऱ्या व्यक्तीचा सन्मान कसा होऊ शकतो ?’’ खरेच आहे. समोरच्या व्यक्तीचा अपमान हा स्वत:चा सन्मान समजण्याला ‘विकृती’खेरीज दुसरे काय म्हणायचे ?

१. ज्ञानवापी मशिदीमध्ये केलेला ‘वजू का तालाब’ ही इस्लामी विकृती !

काशीमध्ये ज्ञानवापीमधून पुरातन शिवलिंग प्रकटल्यानंतर इस्लामचा अगदी प्रारंभापासून असलेला असाच विकृत चेहरा पुन्हा एकदा ठळकपणे जगासमोर आला. तो कसा ? हे शिवलिंग जिथे सापडले, ती जागा ‘वजू का तालाब’ आहे. वजू म्हणजे काय ? तर मशिदीत प्रवेश करण्यापूर्वी शुचिर्भूत होण्याचा विधी. यात स्वतःचे हात-पाय दोन-दोन वेळा धुणे, गुळणी करणे, नाक शिंकरणे अशा कृती अंतर्भूत आहेत. आता आपल्या हे लक्षात येऊ शकेल की, भूतकाळात काशी विश्वेश्वराचे मंदिर केवळ उद्ध्वस्त करून इस्लामी आक्रमकांचे समाधान झालेले नाही, तर हिंदूंना पूज्य असणारे प्रतीक पुढील वर्षानुवर्षे सामान्य मुसलमानांच्या पायाखाली येत राहील, अशी व्यवस्था बरोबर त्याच ठिकाणी ‘वजू का तालाब’ म्हणून करून ठेवली आहे. ही आहे इस्लामी विकृती !

२. ‘काफिरांचा (मुसलमानेतर) अपमान हाच आपला सन्मान’, ही इस्लामची धारणा !

ज्ञानवापी हे काही एकमेव उदाहरण नाही. केवळ भारताच्या इतिहासातच अशी सहस्रो उदाहरणे आपल्याला जागोजागी विखुरलेले दिसतील. एखाद्या हिंदूला मरणही सन्मानजनक येऊ न देण्याची काळजी प्रत्येक इस्लामी आक्रमकाने घेतलेली आहे. शिखांचे पाचवे गुरु अर्जुनदेव यांना सोललेल्या गायीच्या कातड्यात शिवण्याचा प्रकार असो किंवा गुरु तेगबहादूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भर चौकात केलेली क्रूर हत्या असो; गुरुपुत्र फत्तेसिंह अन् जोरावरसिंह यांना कोवळ्या वयात भिंतीत मारण्याचा प्रकार असो किंवा स्वराज्याचे छत्रपती शंभूराजे यांचे २० हून अधिक दिवस सलग शारीरिक हाल करून क्रौर्याने केलेली त्यांची हत्या असो, अशा सर्व उदाहरणांत एकच समान सूत्र दिसून येते, ते म्हणजे ‘इस्लाम मान्य नसलेल्यांचा अधिकाधिक अपमान.’ ही काही ठळक उदाहरणे आहेत. घोरी, ऐबक, तैमूर, तुघलक, खिलजी, बाबर, औरंगजेब, टिपू इत्यादी सर्व आक्रमकांच्या काळात अक्षरश: लाखो हिंदूंनी असे अपमान सातत्याने सहन केले आहेत. याखेरीज ‘काफिरांचा अपमान हाच आपला सन्मान’, ही इस्लामची धारणा अगदी स्वत:च्या कृतींमधून महंमद पैगंबर यांनीच घडवलेली असल्याने ‘मूळ इस्लाम असा नाही’ वगैरे भ्रमात रहाण्याचे अजिबातच कारण नाही.

३. हिंदूंचे प्रभावी संघटन, हेच आक्रमकांनी पुन्हा धाडस न करण्यासाठीचे साहसी उत्तर !

आज ज्ञानवापीमध्ये शिवलिंग सापडल्याचा आनंद साजरा करत असतांना वर्षानुवर्षे आपल्या श्रद्धास्थानांचा जाणीवपूर्वक केला गेलेला अपमान कदापि विसरता कामा नये. आजचा काळ हा अशा अपमानांची व्याजासहित भरपाई करण्याचा आहे. ‘मागच्या गोष्टी कशाला उकरता’ वगैरे ज्ञान पाजळणाऱ्या विद्वानांची यत्किंचित्ही नोंद घेण्याचे कारण नाही. आपल्याला काळजी करायची आहे, ती केवळ हिंदू एकतेची ! येणाऱ्या काळात हिंदू असेच संघटित राहिले, तर काशीत श्री विश्वनाथ आणि मथुरेत भगवान श्रीकृष्ण पुन्हा सुप्रतिष्ठित होतीलच; पण भविष्यात आपल्या श्रद्धास्थानांकडे वाकड्या नजरेने पहाण्याचे साहस त्यांना होणार नाही, असे संघटन आपण करायला हवे. ‘हिंदूंचा अपमान हा ज्यांना आपला सन्मान’ वाटतो, त्यांचा मान हिंदूंनी तरी ठेवण्याचे काय कारण आहे ?

– महेंद्र वाघ

(प्रेषक – श्री. विजय अनंत आठवले)