शहापूर येथे राज्यस्तरीय ‘लोक हिंद गौरव पुरस्कार’ सोहळा संपन्न !

ठाणे – ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतीदिनानिमित्त लोक हिंद वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक शिवमार्ग यांच्या वतीने शहापूर येथील साई भगवान लॉन्स येथे रसिकांच्या प्रचंड उपस्थितीत राज्यस्तरीय ‘लोक हिंद गौरव’ पुरस्कार सोहळा पार पडला. राज्यातील ४१ मान्यवरांना मानपत्र, सन्मानचिन्ह, मानाचा फेटा, तुकाराम गाथा आणि मानवस्त्र देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. आपले संपूर्ण आयुष्य गांधीवादी विचारसरणीवर घालवणारे असोळे, मुरबाड येथील माजी सरपंच मारुती पाटील कोर यांना ‘लोक हिंद जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप धानके यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक महेश धानके यांनी केले.

कार्यक्रमास ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दशरथ तीवरे, ‘डी वाय फाउंडेशन’चे संस्थापक दयानंद चोरघे, कृषी पशूसंवर्धन सभापती संजय निमसे, नायब सुभेदार आणि ‘सैनिक कल्याण फेडरेशन’चे जिल्हा अध्यक्ष निलेश पाटील, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे अंगरक्षक राजू पाटील, कुणबी समाज संघाचे अध्यक्ष किशोर कुडव, कुणबी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय पाटील, जिजाऊ संघटनेच्या मोनिका पानवे, नम्रता सांबरे, विशाखा पाटील, अरुणा खाकर, जिल्हा परिषद सदस्य राजेश विशे, काशिनाथ पष्टे, तुकाराम ठाकरे, मुरबाड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चेतनसिंह पवार, सोमनाथ मिरकुटे, संजय चौधरी, माजी सभापती गजानन गोरे, जनक्रांतीचे युवक अध्यक्ष रोहन दिलीप धानके, तुकाराम भाकरे, जितेश विशे, योगेश हजारे, रमेश हिंदुराव, राजू चौधरी, भास्कर वडवले, गजानन जाधव, निवड समितीचे अध्यक्ष किसन बोन्द्रे आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमात लोक हिंदचे उत्कृष्ट काम केलेल्या रवींद्र जाधव, शरद रातांबे, सतीश घरत यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तर निवड समितीच्या सर्व सदस्यांचाही सन्मान करण्यात आला.

यूपीएससीच्या वैद्यकीय अधिकारी पदासाठी असलेल्या परीक्षेत महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या कु. भविका उमवणे हिचा विशेष सन्मान करण्यात आला. दशरथ तिवरे आणि मोनिका पानवे यांनी आपल्या भाषणातून ‘लोक हिंद टीम’चे कौतुक केले. भावाची स्मृती जपण्यासाठी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करणारे महेश धानके यांच्या बंधूप्रेमाचे कौतुक या वेळी करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री लक्ष्मण घरत, रामचंद्र जोशी, अंकुश भोईर, रवींद्र जाधव, अरविंद निपुरते, संदीप मुंज, सुधीर भोईर, नवनाथ पवार, गोपाळ वेखंडे, रवींद्र परटोले, कांतीलाल वरकुटे, शरद रातांबे, ऋषिकेश धानके, राम वाघ, सिद्धार्थ धानके, धनश्री पाठारी, वैशाली घरत, सतीश घरत यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास राज्यभरातून सुमारे ८०० रसिक उपस्थित होते.