श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना भेटण्याची तीव्र इच्छा असणे आणि त्यांच्या दर्शनाने भावजागृती होणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन व्हावे’, या तीव्र इच्छेने आगाशीत हात जोडून प्रार्थना करत उभी रहाणे

‘२४.१.२०२२ या दिवशी सकाळी ७.४५ वाजता श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दैवी दौऱ्यावर निघणार होत्या. मला त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. ‘एकदा तरी मला देवीस्वरूप श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन व्हावे’, या विचाराने मी आश्रमाच्या आगाशीत जाऊन उभी राहून खाली उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीकडे पहात होते. मी मनात विचार केला, ‘त्या गाडीत बसायला येतील, तेव्हा मी त्यांना मानस नमस्कार करीन.’ मी दोन्ही हात जोडून प्रार्थना करू लागले, ‘त्या मला स्थुलातून भेटल्या नाहीत, तरी त्यांनी किमान सूक्ष्मातून माझा नमस्कार स्वीकार करावा. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, आपण माझ्यावर कृपा करावी. माझी साधना चांगली होऊदे. मला श्रद्धेसह, तीव्र गतीने आणि तळमळीने साधना करता येऊदे.’

श्रीमती मिथिलेश कुमारी

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी गाडीतून उतरून साधिकेची विचारपूस करणे आणि ‘लवकरच परत येते’, असे सांगून दौऱ्यावर जाणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ गाडीत बसत असतांना मी त्यांना पाहिले; परंतु त्यांनी मला पाहिले नाही. एवढ्यात एका साधिकेची दृष्टी वर गेली आणि ‘मी दोन्ही हात जोडून उभी आहे’, हे पाहून तिने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना सांगितले, ‘‘वरच्या आगाशीतून श्रीमती वेदकाकू आपल्याला नमस्कार करत आहेत.’’ हे ऐकताच त्या गाडीतून खाली उतरून खालूनच माझ्याशी बोलू लागल्या. त्यांनी माझी विचारपूस केली आणि ‘‘लवकरच परत येते’’, असे सांगून त्या गाडीत बसल्या अन् त्यांच्या दौऱ्यासाठी निघाल्या.

३. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या दर्शनाने पुष्कळ दिवसांनी भावजागृती अनुभवता येणे आणि त्यासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रतीही कृतज्ञता वाटणे

मी त्यांच्याकडे पहातच राहिले. माझी भावजागृती होऊन मला भावाश्रू अनावर झाले. माझे मन आनंदी झाले आणि तो आनंद संपूर्ण दिवसभर टिकून होता. गेल्या काही मासांपासून माझा भाव जागृत होत नव्हता; परंतु आज माझा पुनःपुन्हा भाव जागृत होऊ लागला आणि मला आनंद होऊ लागला. माझे मन पुष्कळ उत्साही झाले आणि तो उत्साह आजपर्यंत टिकून राहिला आहे.

अशा देवीस्वरूप श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना माझा कोटीशः नमस्कार ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच ही कृपा आहे. ते विविध माध्यमांतून माझी भावजागृती करवून घेत आहेत. ते सर्वकाही बघत असतात. ते माझ्या मनातील प्रत्येक इच्छा जाणतात. त्यामुळे त्यांनी माझ्यामध्ये भाव जागृत करवून घेतला. अशा विश्वविधाता ईश्वरस्वरूप गुरुदेवांच्या चरणी माझा अनंत कोटी नमस्कार !

– श्रीमती मिथिलेशकुमारी वेद (वय ६२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२४.१.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक