आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

अन्नदान आणि त्यासंदर्भातील काही महत्त्वपूर्ण कृती आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

(भाग १०)

पू. तनुजा ठाकूर

१. हिंदु राष्ट्रात प्रत्येक वसाहतीत गोशाळा उभारली जाणार असल्याने पहिली पोळी गोमातेला देता येणार असणे

अन्नपूर्णाकक्षात पोळ्या केल्यानंतर पहिली पोळी ही गायीला द्यायला हवी, तर शेवटच्या पोळीवर कुत्र्याचा अधिकार असतो. आजच्या निधर्मी लोकशाहीत शहरात गोमाताच दिसून येत नाहीत. अनेकदा गल्लीत कुत्रेसुद्धा नसतात. अशा वेळी त्या पोळीचे तुकडे अन्य पशू-पक्ष्यांना खाण्यासाठी घालावेत. हिंदु राष्ट्रात महानगरे किंवा शहरे यांमध्ये प्रत्येक वसाहतीत एक गोशाळा असेलच. त्यामुळे ‘पहिली पोळी गायीला कशी खायला द्यायची ?’, हा प्रश्नच निर्माण होणार नाही.

२. आपल्या वाट्याला आलेल्या धान्यातील एक मूठ धान्य अर्पण केल्यास अन्नपूर्णादेवीची कृपा संपादन करता येणे आणि प्रतिकूल स्थितीत तिने सदैव अन्न पुरवणार असणे, हा त्यागाचा महिमाच असणे

पीठ किंवा तांदूळ शिजवण्यासाठी घेण्यापूर्वी त्यातील एक मूठ पीठ किंवा तांदूळ प्रथम एका भांड्यात बाजूला काढून ठेवावेत. भिक्षुक किंवा भिकारी यांना ते द्यावे. सध्या इमारत किंवा वसाहत येथील सुरक्षारक्षक अशा लोकांना आमच्यापर्यंत पोचू देत नाहीत. त्यामुळे जवळपास जर एखादे गुरुकुल किंवा आश्रम असेल, तर तेथे सोयीनुसार किंवा वेळेनुसार अन्नदान करावे. माझी आई नेहमी असे करायची. आता सध्याच्या काळात हे सर्वत्रच लोप पावत आहे. खरे पहाता आपल्या वाट्याला आलेल्या धान्यातून एक मूठ धान्य बाजूला काढल्यामुळे होणारा त्याग आपल्याला संपूर्ण जीवनात अन्नाची कधीच उणीव भासू देणार नाही. अन्नपूर्णामाताही प्रतिकूलातील प्रतिकूल परिस्थितीतही तुम्हाला सदैव अन्न पुरवेल, हा या त्यागाचा महिमा आहे.

३. देवत्व हे त्यागातून निर्माण होत असल्याने अतिथी, ब्राह्मण किंवा भिक्षुक यांना प्रथम जेवण द्यावे !

हिंदु धर्म आपल्याला त्यागी वृत्ती शिकवतो. सध्या सर्वजण स्वार्थी झाले आहेत. आज समाज त्याचाच परिणाम भोगत आहे. पूर्वीच्या काळी एखादा अतिथी, ब्राह्मण किंवा भिक्षुक यांना जेवण दिल्याविना गृहस्थ स्वतः अन्न ग्रहण करत नसे; परंतु आज स्थिती प्रतिकूल झाली आहे. त्यामुळे ही सोपी सवय आपल्या जीवनात आत्मसात करावी आणि आपल्या पुढील पिढीलासुद्धा ही शिकवावी; कारण देवत्व हे भोगामुळे नाही, तर त्यागातून निर्माण होते, हे लक्षात घ्यावे !

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (८.२.२०२२)