श्रीमन्नारायणाचे अवतार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी साधकांची आर्ततेने आणि कळकळीने प्रार्थना !

‘हे श्रीमन्नारायणा, आज ‘श्रीजयंत’ अवताराला शरीर धारण करून ८० वर्षे पूर्ण झाली. आज आम्हा साधकांना ‘श्रीजयंत’ अवताराचा ८० वा जन्मोत्सव साजरा करण्याची संधी लाभली आहे. त्यातील आम्हा बहुतांश साधकांना २० ते ३० वर्षे भगवंताच्या सगुण रूपाचा सहवास लाभला. भगवंता, आम्हाला कळले नाही की, ‘तूच आम्हाला गुरुरूपात लाभला आहेस. या बृहत् (विशाल) सनातन कुटुंबाचे वडील असल्याप्रमाणे आम्ही तुमच्याशी वागलो, बोललो आणि कधी कधी हट्टही केला; परंतु भगवंता, तू आम्हाला भरभरून आनंद दिलास. आम्ही साधक तुझ्या समवेत होतो, असे नाही, तर हे श्रीहरि, तूच आम्हाला तुझ्या सहवासात ठेवलेस. हे वैकुंठाधिपती, तू वैकुंठातून केवळ सनातनच्या साधकांसाठी आला आहेस. देवा, तुला हे ठाऊक होते, आम्ही साधक प्रलयकारी आपत्काळात तुझ्या छायेविना तरू शकत नाही; म्हणून तू ‘गुरु’ हे रूप धारण केले आहेस. आज आम्ही त्या प्रलयकारी आपत्काळाच्या अगदी उंबरठ्याशी उभे आहोत. आम्हाला एकमेव तुझ्या चरणांचाच आधार आहे. तुझे सुंदर हास्यच आमचे दुःख दूर करणारे आहे आणि तुझे बोलच आमचे उत्साहवर्धक आहेत. आम्हा साधकांचे रक्षण कर, हे श्रीजयंता, श्रीजयंता, श्रीजयंता !’

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू.