नवी देहली – दक्षिण पश्चिम मौसमी पावसाचे अंदमान-निकोबार द्वीपसमुहात आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली. त्यामुळे द्वीपसमुहात पाऊस होत असल्याचेही खात्याने सांगितले. पुढील २-३ दिवसांत मौसमी पाऊस पुढे सरकणार असून दक्षिण बंगाल खाडी आणि संपूर्ण अंदमान समुद्र येथे पाऊस पडेल, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पुढील ५ दिवसांत तमिळनाडू, तसेच लक्ष्यद्वीपच्या काही भागांतही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
South-west monsoon knocks at Andaman & Nicobar islands, early onset over Kerala likelyhttps://t.co/nWha5kJLrH
— The Indian Express (@IndianExpress) May 12, 2022