जिहादी आतंकवाद्यांशी संबंध असणारा काश्मीर विश्‍वविद्यालयातील प्राध्यापक बडतर्फ

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – आतंकवाद्यांशी संबंध असल्यावरून काश्मीर विश्‍वविद्यालयातील प्राध्यापक अल्ताफ हुसैन पंडित याला बडतर्फ करण्यात आले आहे. जिहादी आतंकवादी बुरहान वानी याला ठार मारल्यानंतर सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या निदर्शनांत अल्ताफचा सहभाग होता. अल्ताफ वर्ष १९९० ते १९९३ या काळात जिहादी आतंकवादी संघटना ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’चा सदस्य होता. त्यानंतर तो वर्ष २०१५ ते २०१७ या काळात विश्‍वविद्यालयाच्या शिक्षक संघटनेचा सदस्य बनला होता, तसेच नंतर तो उपाध्यक्षही होता. (आतंकवादी संघटनेत असणार्‍याला प्राध्यापक म्हणून निवडले कसे गेले ? याचा शोध घेऊन संबंधितांवरही कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर कारागृहात टाकून कठोर शिक्षा करायला हवी !