गुना (मध्यप्रदेश) येथे शिकार्‍यांच्या गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू

गुना (मध्यप्रदेश) – येथे शिकार्‍यांनी केलेल्या आक्रमणात ३ पोलिसांचा मृत्यू झाला. या गोळीबारात चालक गंभीररित्या घायाळ झाला आहे. या घटनेविषयी राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी या घटनेविषयी उच्चस्तरीय बैठकही आयोजित केली. यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १ कोटी रुपये साहाय्य देण्याची घोषणा केली. हे शिकारी एका काळ्या हरिणाची शिकार करून जात असतांना त्यांची पोलिसांशी चकमक झाली. यात पोलीस उपनिरीक्षक राजकुमार जाटव, हवालदार नरीज भार्गव आणि शिपाई संतराम यांचा मृत्यू झाला.

संपादकीय भूमिका

देशात शिकार करण्यावर बंदी असतांना शिकारी शिकारही करतात आणि त्यांना विरोध करणार्‍या पोलिसांनाही मारतात, हे लज्जास्पद !