‘सध्या भारतात प्रार्थनास्थळावरील अवैध भोंग्याच्या सूत्रावरून बराच गदारोळ चालला आहे. याविषयी धर्म, अध्यात्म आणि संत महात्मे काय सांगतात ? याचा आपण विचार करू शकतो. संत कबीरदास हे महान संत आणि समाजसुधारक कवी होऊन गेले. त्यांनी कोणत्याही धर्माची बाजू न घेता मानवाचे कल्याण व्हावे, भक्तीभाव, तसेच सामाजिक सौहार्द वाढावा, यासाठी त्यांच्या दोह्यांमधून मार्गदर्शन केले आहे. त्यांनी कर्मकांडाच्या अवडंबराविरुद्ध ताशेरे ओढून लोकांना अंतर्मुख करून ईश्वरभक्ती करण्यास सांगितले. सध्याच्या समाजातील गोंधळेल्या स्थितीमध्ये त्यांनी लिहिलेले पुढील दोहे मार्गदर्शक ठरतील, असे मला वाटते.
ना जाने तेरा साहिब कैसा है ।
मस्जिद भीतर मुल्ला पुकारे, क्या साहिब तेरा बहरा है ।
चींटी के पग नेवर बाजै, सो भी साहिब सुनता है ।।
संत कबीरदास म्हणतात, ‘ईश्वर मुंगीच्या पायातील घुंगरांचा आवाजही ऐकू शकतो, म्हणजेच ईश्वर त्याच्या भक्ताचा सूक्ष्म आवाजही ऐकू शकतो. असे असतांना त्याला मोठ्याने हाक मारण्याची आवश्यकताच काय ?’ ही त्यांची शिकवण भोंग्याचा शोध लागण्याआधी ५०० वर्षांपूर्वीची आहे. या संतवचनाचा ‘सामाजिक आणि धार्मिक हिताच्या दृष्टीने लोकांनी यातून बोध घेतला, तर बरे होईल’, असे मला वाटते. (११.५.२०२२)
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.