राजगड (मध्यप्रदेश) येथे भूमीच्या वादातून हिंदु आणि मुसलमान यांच्यात जाळपोळ !

घटनास्थळ

राजगड (मध्यप्रदेश) – येथील करेडी गावात भूमीच्या वादातून हिंदु आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार झाला. या वेळी दुकाने आणि घरे यांची जाळपोळ करण्यात आली, तसेच दगडफेकही करण्यात आली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. या हिंसाचारात पोलिसांसह ३ जण घायाळ झाले. ११ मेच्या रात्री ही घटना घडली. सध्या येथे तणाव असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !