लाभार्थींची संख्या २२.५८ लाखांनी घटली !
नाशिक – बालमृत्यू, कुपोषण आणि मातामृत्यू रोखण्यासाठी, तसेच सुरक्षित मातृत्वासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना आखण्यात आल्या आहेत; मात्र कोरोनाच्या काळात अपुऱ्या पडलेल्या आरोग्य सेवा यंत्रणेमुळेही या योजनांवर परिणाम झाला. गेल्या ३ वर्षांत ४ योजनांतील लाभार्थी महिलांची संख्या २२.५८ लाखांनी घटून ९.५९ लाखांवर आली आहे. गर्भवती मातांचे पोषण, आरोग्य, संस्थात्मक आणि सुरक्षित बाळंतपण अन् संगोपन या उद्देशाने ४ प्रमुख योजना राबवल्या जातात.
कोरोनाकाळात अपुऱ्या पडलेल्या आरोग्य सेवा यंत्रणेमुळे फटका !
१. जननी सुरक्षा योजनेमधील लाभार्थी मातांची संख्या ३ वर्षांत निम्मी घटली.
२. सुरक्षित मातृत्व अभियानाचा व्यय २२ लाख रुपयांवरून ४ लाख रुपये.
३. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा व्यय निधी ३८१ लाख रुपयांवरून १८६ लाख रुपये.
४. पंतप्रधान मातृत्व अनुदान लाभार्थींची संख्या ४६ सहस्रांवरून २२ सहस्र.