शासन कसे असावे ? याचा आदर्श पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याकडून शासनकर्त्यांनी घ्यावा !

श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे १३ वे वंशज

श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देशभरात अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यांनी आवश्यकतेप्रमाणे रणभूमीमध्ये शत्रूशी सामनाही केला. जेथे बळाचा वापर करणे आवश्यक आहे, तेथे बळाचा वापर करावा आणि जेथे जनहिताची कामेकरणे आवश्यक आहे, तेथे तेच करावे, हे त्यांच्या चरित्रातून शिकता येते. एवढेच नाही, तर जनतेविषयी प्रेमभाव, शत्रूशी चिकाटीने सामना करण्याची शक्ती आणि स्वाभिमान असणारे शासन कसे असावे ? याचा आदर्श आजच्या शासनकर्त्यांनी त्यांच्याकडून घ्यावा.