कष्टाळू, त्यागी वृत्तीच्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या कोची, केरळ येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) प्रियदर्शिनी बांदिवडेकर !

२६.१२.२०२१ या दिवशी कोची, केरळ येथील श्रीमती प्रियदर्शिनी बांदिवडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूच्या वेळी त्यांचे वय ७५ वर्षे होते. केरळ येथील साधिकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्रीमती प्रियदर्शिनी बांदिवडेकर

१. कष्टाळू

श्रीमती बांदिवडेकरकाकूंना कितीही बरे नसले, तरी त्यांना थोडे बरे वाटले की, त्या घरातील सर्व कामे करायच्या.

२. त्यागी वृत्ती

श्रीमती सौदामिनी कैमल

एके काळी काकूंना पुष्कळ आर्थिक अडचणी होत्या, तरीही त्यांनी केरळ येथील सेवाकेंद्रासाठी त्यांच्या घराची भूमी अर्पण केली. आज केवळ काकूंच्या त्यागामुळेच केरळ येथील साधकांची निवासव्यवस्था झाली आहे. त्याबद्दल आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटते.

३. भाव आणि श्रद्धा

त्यांच्यात प.पू. गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती) पुष्कळ भाव होता. त्यांची प.पू. बाबांच्या प्रती (प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रती) श्रद्धा होती.

४. काकूंच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

कु. प्रणिता सुखटणकर

अ. काकूंचे पहाटे झोपेत निधन झाले. काकूंच्या शेवटच्या दर्शनाच्या वेळी ‘त्या गुरुचरणी आनंदावस्थेत आहेत’, असे आम्हाला जाणवले.

आ. त्यांच्या तोंडवळ्यावर प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) अस्तित्व अनुभवायला मिळाले.

इ. ‘काकू साधनेत पुढे जाण्यासाठी गुरूंच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करत आहेत’, असे आम्हाला जाणवले.

ई. आम्हाला वातावरणात दाब जाणवला नाही.

उ. त्यांचे निधन झाल्याच्या दिवशी केरळ येथील सर्व दुकाने बंद होती; मात्र त्यांचे मृत्यूत्तर क्रियाकर्म करायला लागणाऱ्या सर्व गोष्टी वेळेत मिळाल्या. त्यामुळे सर्व विधी सुरळीत पार पडले.

‘श्रीमती प्रियदर्शिनी बांदिवडेकरकाकूंमधील गुण आम्हाला आत्मसात करता येऊ देत’, ही गुरुचरणी प्रार्थना !’

– श्रीमती सौदामिनी कैमल (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के (वय ८० वर्षे) आणि सुश्री (कु.) प्रणिता सुखटणकर, केरळ (२८.१२.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक