भाजप मुसलमानांना ‘सामूहिक शिक्षा’ देत आहे ! – असदुद्दीन ओवैसी

उजवीकडे खासदार असदुद्दीन ओवैसी

नवी देहली – मुसलमानांना भाजप सामूहिक शिक्षा देण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने मुसलमानांच्या विरोधात युद्ध घोषित केले आहे, अशी टीका एम्आयएम्चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. देशात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर झालेल्या आक्रमणांनंतर मुसलमानबहुल भागातील अवैध बांधकामांवर कारवाई केली जात आहे. त्यावरून ओवैसी यांनी ही टीका केली.

१. ओवैसी म्हणाले की, ग्वाल्हेर येथे आसिफ नावाच्या व्यक्तीला एका मुलीशी विवाह केल्यावरून त्याला देशद्रोही ठरवून त्याचे घर पाडण्यात आले. सरकार कायद्याच्या चिंधड्या उडवत आहे. (आसिफ याने हिंदु मुलीला तो हिंदू असल्याचे खोटे सांगून तिच्याशी विवाह केला आणि नंतर तिचे धर्मांतर केले. तसेच तिच्यावर मौलवीला आणि त्याच्या दोन भावांना बलात्कार करू दिले. यामुळे त्याच्या अवैध बांधकामांवर कारवाई करण्यात आली, ही माहिती ओवैसी जाणीवपूर्वक लपवतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

२. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्याच्या प्रकरणाविषयी ओवैसी म्हणाले की, जर कुणी पंतप्रधानांच्या घराबाहेर जाऊन कुराणाचे पठण केले, तर काय होईल ?

संपादकीय भूमिका

  • काँग्रेसची सत्ता असणार्‍या राजस्थान राज्यात हिंदूंना सामूहिक शिक्षा करण्यात येत आहे, याविषयी ओवैसी गप्प का आहेत ?