धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी ‘काम’ नंतर ‘मोक्ष’ सांगितलेला आहे, हे विसरू नका आणि त्या दृष्टीने वाटचाल करा !

‘भारतीय समाजातून लैंगिक संबंधांच्या संदर्भातील ‘अनैतिकता, लाज, अपराधाची भावना आणि भीती’ दूर करण्याची आवश्यकता आहे. भारतीय भूमी ही ‘कामसूत्रा’शी संबंधित असली, तरी लैंगिकतेविषयी सामाजिक चर्चा करण्याला अश्लील समजले जाते, हे अयोग्य आहे’, असे मत अनुष्का आणि साहिल गुप्ता या जोडप्याने व्यक्त केले आहे. या जोडप्याने ‘माय म्यूस’ नावाचे आस्थापन चालू केले असून ‘या माध्यमातून बनवण्यात येणारी लैंगिकतेशी संबंधित उत्पादने विकत घेणाऱ्यांना अपमानास्पद वाटणार नाही, किंबहुना या उत्पादनांचा प्रथमच उपयोग करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल’, असे त्यांनी म्हटले आहे.’