‘मी सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारताच न्यायालयांतील रिक्त पदांवर भरती आणि पायाभूत सुविधांत सुधारणा, यांत लक्ष घातले आहे. न्यायालयांची संख्या पुरेशी असली आणि तेथे योग्य त्या पायाभूत सुविधा असल्या, तरच लोकांना न्याय देणे शक्य होईल. त्यामुळे मी यात लक्ष घातले आहे. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांत एकही रिक्त जागा असता कामा नये, अशी माझी इच्छा आहे’, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी भाग्यनगर (तेलंगाणा) येथे केले.’