‘परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन दुर्लभ झाले आहे’, हा विचार मनात येऊन साधकाच्या मनाची झालेली भावविभोर अवस्था !
‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) रामनाथी, गोवा येथील आश्रमातील त्यांच्या खोलीतून बाहेर येत नाहीत. त्यामुळे त्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. ‘आता गुरुदेव मला भेटणार नाहीत’, या भावाने माझे मन भावविभोर झाले. त्या वेळी देवाने मनःपटलावर उमटवलेली खालील शब्दसुमने गुरुरायांच्या चरणी अर्पण करत आहे.
सच्चिदानंद स्वरूपी गुरुराया (टीप १) ध्यानमग्न झाले ।
ध्यानस्वरूपी असलेले गुरुराया अतीसूक्ष्म झाले ।। १ ।।
विश्वच नव्हे, तर सप्तपाताळ गुरुदेवांनी व्यापले ।
संकल्पपूर्तीने हिंदु राष्ट्र निर्मितीचे कार्य गतीमान झाले ।। २ ।।
देवा (टीप १), तुझ्या कार्याची व्यापकता मोजणे अशक्य असे ।
तुझ्या प्रीतीचा झरा जणू सागराला व्यापून टाकत असे ।। ३ ।।
तुझ्या चैतन्याची व्यापकता ब्रह्मांडाला गवसणी घालत असे ।
देवा, तुझे हे सूक्ष्म कार्य भक्तांना भावातीत करत असे ।। ४ ।।
देवा, तूच आहेस एकमेव देव ! देवा, तूच एकमेव देव असे ।
अवतार धारण करूनी तू वसुंधरेलाही चैतन्यमय करत असे ।। ५ ।।
देवा, लीन झालो तव चरणा, लीन तव चरणा ।
लागावी भक्तीरसाची गोडी, हीच आर्त प्रार्थना ।। ६ ।।
टीप १ – सच्चिदानंद स्वरूपी गुरुराया : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
टीप २ – देव : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
श्रीविष्णुर्पणमस्तु,
– श्री. अविनाश जाधव (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|