गेल्या २ वर्षांपासून रस्त्यांची दयनीय स्थिती !
धुळे – शहरातील देवपूर भागात गेल्या २ वर्षांपासून रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी अनेक सामाजिक संघटना आणि नागरिक रस्त्यावर उतरले; मात्र त्यांच्या मागणीकडे येथील महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा धुळे दौरा २२ एप्रिल या दिवशी अचानक निश्चित झाल्याने महापालिकेकडून रातोरात देवपूर परिसरातील रस्त्यांचे काम जलद गतीने करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मागणी करत आहेत की, केंद्रीय मंत्र्यांनी वारंवार धुळे दौरा करावा, म्हणजे यानिमित्ताने का होईना, धुळे शहरातील रस्ते चकाकतील !
शहरातील कार्यक्रम आटोपून दुपारी देवपूर येथील एका कार्यकर्त्याच्या निवासस्थानी नितीन गडकरी जाणार आहेत. यामुळे गणपति पुलापासून ते कार्यकर्त्याच्या घरापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. या आधी भूमीगत गटाराच्या ठेकेदाराने रस्त्यावर केवळ ‘पॅच’ मारले असल्याने चालणे अवघड जात होते. या कार्यकर्त्याच्या निवासस्थानाच्या व्यतिरिक्त शहरातील ज्या रस्त्यांवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जाणार आहेत, त्या रस्त्यांचेही डांबरीकरण करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका
|