‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या अध्यात्म संशोधन केंद्रात वास्तव्यास आल्यानंतर ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिका सौ. मायस्सम नाहस यांना स्वतःत जाणवलेले पालट

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिका सौ. मायस्सम नाहस ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या अध्यात्म संशोधन केंद्रात काही दिवस वास्तव्यास आहेत. त्या येथे येण्यापूर्वी त्यांची साधनेची स्थिती आणि येथे आल्यानंतर त्यात त्यांना जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

सौ. मायस्सम नाहस

१. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या अध्यात्म संशोधन केंद्रात वास्तव्यास येण्यापूर्वी

अ. ‘मी घरी असतांना माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित होत असत. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन या प्रक्रियेच्या अंतर्गत प्रतिदिन ८ ते १० स्वयंसूचना सत्रे होत असत. मला प्रतिदिन ४ घंटे नामजप करण्यास सांगितले होते. त्यानुसार माझा ९० टक्के नामजप होत असे.

आ. माझे साधनेच्या दृष्टीने आत्मचिंतन आणि भाववृद्धी होण्यासाठीचे प्रयत्न नियमित होत होते.

इ. दिवसभरात किमान ६० टक्के वेळ मला परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत असे. कधी कधी याचे प्रमाण अधिकही असायचे.

ई. गेले १० मास मी प्रतिदिन केवळ दोनच घंटे सेवा करत असून ती चांगली होत होती.

उ. माझ्या मनात ‘मी कशी दिसते ?’, याचेच विचार अधिक असून माझी देहबुद्धी अधिक असे.

ऊ. मला नेहमी ‘बाहेर फिरायला जावे’ अथवा ‘उपाहारगृहात जावे’, असे वाटत असे. मी आणि यजमान जेव्हा बाहेर फिरायला जात असू, तेव्हा माझ्या मनात मायेतील विचार अधिक येऊन माझी बहिर्मुखता वाढत असे. त्या कालावधीत साधनेविषयी विचार करणे मला पुष्कळ कठीण जायचे.

ए. प्रतिदिन मला ‘पुष्कळ झोपावे’, असे वाटत असे; परंतु एकही रात्र मला झोप येत नसे.

ऐ. मागील वर्षी एकदा माझ्या पलंगपोसवर अनिष्ट शक्तीच्या आक्रमणामुळे रक्ताचे डाग आढळले होते. त्यानंतर जून २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत माझा आध्यात्मिक त्रास पुष्कळ वाढला. मार्च २०२२ पासून माझा आध्यात्मिक त्रास पुष्कळ उणावला आहे. माझ्यातील हा पालट यजमानांच्याही लक्षात आला.

२. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या अध्यात्म संशोधन केंद्रात वास्तव्यास आल्यानंतर

अ. पहिले दोन दिवस मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास झाला. मला येथे सहजतेने वावरता येत नव्हते, तसेच मला पुष्कळ थकवाही जाणवत होता. असे असूनही मी काही घंटे चांगली सेवा करू शकत आहे.

आ. मी इकडे आल्यावर कौटुंबिक समस्यांमध्ये पुष्कळ वाढ झाली. माझ्या वडिलांना रुग्णालयात भरती करावे लागले, तसेच माझे यजमान आणि मुलगा यांनाही काही समस्या आल्या.

इ. येथे मला सहजतेने सेवा करता येत असून सेवा करतांना मला अधिक प्रेरणा मिळत आहे.

ई. सध्या मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी प्रतिदिन ३ घंटे नामजपादी आध्यात्मिक उपाय करायला सांगितले आहे. हे उपाय माझ्याकडून चांगले होत आहेत.

उ. माझे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठीचे प्रयत्न नियमितपणे होत आहेत.

ऊ. दिवसभर मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनुसंधानात असते. मला त्यांचे अस्तित्व सतत जाणवते. मी घरी असतांना साधनेविषयी जसे आत्मचिंतन होत असे, तसेच येथे आल्यावरही होत आहे.

ए. रात्री मला अधिक प्रमाणात आध्यात्मिक त्रास होतो. त्यामुळे मला झोप येत नाही. तिसर्‍या दिवशी रात्री मला १०-१२ मुंग्या चावल्या. त्यामुळे माझा त्रास वाढला आणि मला झोप आली नाही.

ऐ. येथे आल्यापासून माझे मायेतील विचार न्यून झाले असून देहबुद्धीची जाणीवही अल्प असते. माझ्या मनात केवळ साधनेचे विचार येतात.’

– सौ. मायस्सम नाहस (एप्रिल २०२२)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक