(म्हणे) ‘मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय देशातील कोणत्याही न्यायालयाने दिला नाही !’

  • हिंदुद्वेषी अंनिसचे असीम सरोदे !

  • राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी

  • प्रदूषणाविषयी आवाज उठवणारे तथाकथित पर्यावरणवादी मशिदींवरील भोंग्यांविषयी गप्प का ? – संपादक

  • मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय दिला नसला, तरी ‘ध्वनीप्रदूषण करा’ असा आदेशही दिलेला नाही ! दिवसातून ५ वेळा बहुसंख्यांची झोपमोड करणे, विद्यार्थी, रुग्ण, वृद्ध यांना त्रास होईल इतका आवाज करून जनतेला त्रास द्या, असेही न्यायालयाने सांगितलेले नाही, म्हणून भोंगे उतरवण्याची आवश्यकता आहे ! – संपादक

  • पर्यावरणासाठी हिंदुद्वेषी भूमिका घेणाऱ्या अंनिसच्या असीम सरोदे यांना मशिदीवरील भोंग्यांच्या ध्वनीप्रदूषणाविषयी काही वाटत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक

मुंबई – भारतातील कोणत्याही न्यायालयाने मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय दिलेला नाही. याविषयी न्यायालयाने निर्णय दिल्याचा खोटा दावा राज ठाकरे करत असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करावा, अशी मागणी पुण्यातील अधिवक्ता असीम सरोदे यांनी केली आहे.

असीम सरोदे पुढे म्हणाले की, राज ठाकरे चुकीच्या पद्धतीने विषय मांडत आहेत. त्यामधून धार्मिक तेढ निर्माण होण्याचे काम चालू झाले आहे. ’मशिदीवरील भोंगे काढा, असा निर्णय कोणत्या न्यायालयाने दिला आहे ?’, हे राज ठाकरे यांनी दाखवून द्यावे. न्यायालयाचा हवाला देऊन ते खोटे बोलत असतील, तर त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद होणे आवश्यक आहे, अशी मागणी सरोदे यांनी केली आहे.

ध्वनीप्रदूषण हा गंभीर विषय असून तो सामाजिक स्वास्थ्यासाठी हानीकारक आहे. सर्व नागरिकांनी मिळून सामाजिक स्वास्थ्याचा भाग म्हणून एकत्र येऊन ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात काम करणे आवश्यक आहे. कोणत्याही मशिदीवर भोंगा असण्याची आवश्यकता नाही. कोणतेही सण उत्सव, काकड आरत्या भोंग्यावरून करण्याची आवश्यकता नाही, असे सरोदे यांनी सांगितले.