मुंबई – न्यायालयीन निर्णयात भोंगे काढा, असे कुठेही लिहिलेले नाही. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लावू नये, असे लिहिलेले आहे, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.
वळसे पाटील पुढे म्हणाले की, ज्यांना जी प्रार्थना करायची आहे, त्यांनी ती घरात किंवा मंदिरात करावी. उगीच सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.