सांगली, १७ एप्रिल (वार्ता.) – अंकलखोप येथील औदुंबर फाटा येथील गोडसे कुटुंबियांच्या घरी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती उत्साहात पार पडली. याचे आयोजन करण्यात ‘गोडसे डेकोरेटर्स’चे सर्वेसर्वा श्री. संजय गोडसे यांचा पुढाकार होता. या वेळी औदुंबर येथील ह.भ.प. वासुदेवबुवा जोशी यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. श्री. वैभव सूर्यवंशी आणि श्री. सूरज गोडसे यांनी प्रसादाचे नियोजन केले. या प्रसंगी ‘शिवसेना वैद्यकीय साहाय्य कक्षाच्या डॉक्टर सेल आघाडी’चे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक डॉ. किशोर ठाणेकर, ह.भ.प. सर्जेराव शिंदे महाराज, अंकलखोप-औदुंबर येथील माता-भगिनी, ग्रामस्थ, हितचिंतक उपस्थित होते.