नवी देहली – रेल्वेच्या नव्या नियमानुसार रात्रीच्या वेळी प्रवास करतांना कोणत्याही सहप्रवाशाला भ्रमणभाषवर मोठ्याने बोलता येणार नाही, तसेच त्याला मोठ्या आवाजात गाणी ऐकताही येणार नाहीत. अन्य प्रवाशांकडून अशा प्रकारची तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. आवाज करणे किंवा मोठ्या आवाजात बोलणे इत्यादी तक्रारी आल्यास रेल्वे कर्मचार्यांना घटनास्थळी जाऊन समस्या सोडवावी लागणार आहे. यावर तोडगा न निघाल्यास त्याचे संपूर्ण दायित्व रेल्वे कर्मचार्यांवर असेल. रेल्वे बोर्डाच्या वतीने सर्व विभागाच्या महाव्यवस्थापकांना यासंदर्भात आदेश जारी करून नियमांची कार्यवाही करण्यास सांगितले आहे.