‘आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत’, हे लक्षात ठेवून वाटचाल केली, तर ताण येत नाही. राग आणि क्रोध आवरा, स्वतःला सावरा. राग शमवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक असते; पण राग आलेला मनुष्य ते न करता स्वतःचा राग दुसऱ्यावर काढत असतो. रागामुळे तणाव वाढत असतो. राग आवरण्यासाठी व्यसनांचा आधार घेऊ नका. त्यामुळे ताणतणाव वाढण्यासच साहाय्य होईल.
(साभार : मासिक ‘भाग्यनिर्णय’)