‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !

‘हनुमान चिरंजीव असल्याने त्याची जयंती साजरी करण्याऐवजी जन्मोत्सव साजरा करा’, अशा आशयाचे लिखाण सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. (यावर्षी १६ एप्रिल या दिवशी हनुमान जयंती आहे.) याविषयी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी शास्त्रोक्त परिभाषेत सांगितलेले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे.

‘जयंती’ म्हणजे देवाचा जन्मदिवस !

(संदर्भ : शालेय संस्कृत शब्दकोश, संपादक – श्री. मिलिंद दंडवते, प्रकाशक – वरदा बूक्स, पुणे -१६)

‘हनुमान’ ही शाश्वत चैतन्य शक्ती आहे; म्हणून ती शक्ती चिरंजीव आहे. ही शक्ती अंजनीच्या माध्यमातून प्रकटली. या शक्तीने प्रकट झाल्यावर सूर्याच्या प्राप्तीसाठी झेप घेतली. रामायण काळात काही विशिष्ट उद्देशाने विशिष्ट कार्यासाठी ‘हनुमान’ किंवा ‘मारुति’ या नावाने ती शक्ती कार्यरत झाली.

त्यामुळे ‘हनुमान जयंती’ असे म्हणणेच योग्य राहील ! तसेच हा प्रघातही आहे.’