(म्हणे) ‘आक्रमणकर्ता मुर्तजा मनोरुग्ण !’

श्री गोरखनाथ मंदिरावरील आक्रमणाचे प्रकरण

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा जावईशोध

समाजवादी पक्ष हा जिहादी आतंकवादी यांंना पाठीशी घालणारा पक्ष आहे, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. याच पक्षाच्या सत्तेच्या वेळी कारसेवकांना गोळ्या घालून ठार करून त्यांच्या मृतदेहांना मोठे दगड बांधून शरयू नदीत फेकण्यात आले होते. आता उत्तरप्रदेश सरकारने अशा प्रकारे जिहाद्याची बाजू घेणार्‍या पक्षावरही कारवाई करण्याचा कायदा केला पाहिजे ! – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील श्री गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला जिहादी अहमद मुर्तजा अब्बासी यांचा बचाव समाजवादी पक्षाकडून करण्यात आला आहे. समजवादी पक्षाने मुर्तजा याला ‘मनोरुग्ण’ ठरवले आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले की, मुर्तजा यांच्या वडिलांनी सांगितले आहे की, तो मनोरुग्ण आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मानसिक आजाराच्या व्यक्तीच्या आजाराकडे लक्ष देण्याचीही आवश्यकता आहे; मात्र भाजप हे प्रकरण अवास्तव लावून धरत आहे. (मुर्तजाकडून दोन पोलीस कर्मचार्‍यांवर प्राणघातक आक्रमण करण्यात आले, त्याविषयी अखिलेश यादव का बोलत नाहीत ? – संपादक)

काय आहे वस्तूस्थिती ?

पोलिसांनी मुर्तजा यांच्या आतापर्यंच्या केलेल्या चौकशीमध्ये ‘मुर्तजा याचे जिहादी आतंकवादी संघटनांशी संबंध होते’, असे समोर आले आहे. तो फारच हुशार असून तो आतंकवादी आक्रमण करण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या भ्रमणसंगणकामध्ये आणि भ्रमणभाष संचामध्ये सापडलेल्या व्हिडिओमध्ये जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श झाकीर नाईक याचेही व्हिडिओ होते. तो ‘लोन वुल्फ अटॅक’ (एकट्याने करण्यात येणारे आक्रमण) असणारे व्हिडिओ पहात होता. पोलिसांना त्याच्याकडे एक ‘एअरगन’ही सापडली आहे. त्याद्वारे तो घरातच नेमबाजीचा सराव करत होता.

मुर्तजा याला कोणताही मानसिक आजार नाही ! – मुर्तजा याच्या पहिल्या पत्नीचा खुलासा

पहिल्या पत्नीला मारहाण केल्याच्या प्रकरणामुळे मुर्तजा याचा घटस्फोटही झाला आहे. सलमा या त्याच्या पहिल्या पत्नीनेही स्पष्ट केले की, त्याला कोणताही मानसिक आजार नाही.