पूर्वीच्या काळी आमचे पूर्वज म्हणायचे, ‘चिंचेच्या झाडाखाली रात्री झोपू नये; कारण तिथे भूताचे वास्तव्य आहे.’ या भीतीने लोक रात्रीच्या वेळी चिंचेच्या झाडाखाली जात नव्हते, तसेच झोपतही नव्हते. यामागील वैज्ञानिक कारण म्हणजे रात्रीच्या वेळी तुळस वगळता इतर सर्व वृक्ष कार्बनडायऑक्साईडचे उत्सर्जन करतात. त्यातल्या त्यात चिंचेच्या झाडाला सर्वाधिक पाने असल्यामुळे ते सर्वाधिक प्रमाणात कार्बनडायऑक्साईड सोडतात आणि पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने जीव गुदमरून मृत्यू ओढावण्याची शक्यता दाट असते. त्याकाळी विज्ञान एवढे प्रगत नव्हते आणि लोक भूतप्रेतांना घाबरत होते; म्हणून ‘चिंचेच्या झाडाखाली रात्री झोपू नये; कारण तिथे भूताचे वास्तव्य आहे’, अशी भीती दाखवली जायची आणि तुळशीच्या झाडाची पूजा करून संगोपन करावे, असे सांगितले जायचे.
संकलक – ह.भ.प. विठ्ठलबुवा शेळके
(साभार – सामाजिक संकेतस्थळ)