‘मी नेहरू यांचा आदर करतो. त्यांना वाटायचे, ‘शांतीदूत बनावे, कबुतरे उडवावीत.’ कदाचित् हा त्यांचा कमकुवतपणा होता. त्यांच्या या धोरणामुळे देश कमकुवत बनला, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ते पुढे म्हणाले की, वर्ष १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी अणूबाँबची चाचणी केली. तो अणूबाँब २० वर्षांपासून तसाच ठेवण्यात आला होता. काँग्रेस सरकार घाबरायचे; पण वाजपेयी यांनी ही चाचणी घडवून आणली. आपण कुणालाही शत्रू मानत नाही; परंतु आपल्या देशाला मात्र चारही बाजूंनी शत्रूंनी घेरले आहे.’