गांधीजींच्या अहिंसेचे भयानक तत्त्वज्ञान !

‘पूर्व बंगालच्या स्त्रियांनी गांधीजींना विचारले, ‘‘गुंडांनी आमच्यावर हात टाकला, तर आम्ही काय करायचे ?’ गांधीजी म्हणाले, ‘‘श्वास रोखून धरा, म्हणजे तुमचा प्राण जाईल आणि अब्रू वाचेल.’’ डॉक्टरांनी सांगितले, ‘‘श्वास रोखून प्राण जाणार नाही. स्त्री बेशुद्ध होईल आणि गुंडांचे दुष्ट कार्य झाल्यावर ती शुद्धीवर येईल.’’ तेव्हा गांधीजी म्हणाले, ‘‘विषाची कुपी स्त्रियांनी जवळ बाळगावी.’’ अहिंसेच्या अतिरेकाची ही तिरस्करणीय पराकाष्ठा आहे. ‘स्त्रियांनी विष खाऊन मरावे आणि गुंडांवर मात्र सूड घेण्यात येऊ नये’, हे जर गांधीजींच्या अहिंसेचे भयानक तत्त्वज्ञान असेल, तर आग लागो रे, त्या अहिंसेला ! अहिंसेमधून निर्माण झालेल्या भ्याडपणामुळे आणि भेकडपणामुळे या महान देशाचे तुकडे तुकडे झाले.’

(साभार : आचार्य अत्रे लिखित ‘कर्‍हेचे पाणी’ – खंड ४, पान नं. ९०)