श्रीनगरमध्ये २ आतंकवादी ठार

एक आतंकवादी पूर्वीचा पत्रकार !

काश्मीरमध्ये कितीही आतंकवादी ठार झाले, तरी पाकला नष्ट केल्याखेरीज तेथील आतंकवाद नष्ट होणार नाही ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यामध्ये २९ मार्च या दिवशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. रईस अहमद भट आणि हिलाल अह राहा अशी त्यांची नावे आहेत. यातील रईस हा पूर्वी पत्रकार म्हणून काम करायचा. तो अनंतनागमध्ये ‘व्हॅली न्यूज सर्व्हिस’ नावाने ऑनलाईन वृत्तसंकेतस्थळ चालवायचा. (काश्मीरमध्ये आतंकवादी विचारसरणीचे लोक वृत्तसंकेतस्थळ चालवतात, हे लज्जास्पद ! – संपादक) तो मागील वर्षी ऑगस्टमध्ये लष्कर-ए-तोयबामध्ये सहभागी झाला होता.