‘द कश्मीर फाइल्स’मध्ये दाखवल्याप्रमाणे देशवासियांचे हाल झाल्यास चित्रपट पहायलाही कुणी शेष रहाणार नाही ! – अभयसिंह इचगांवकर

पंढरपूर येथे हिंदु महासभेच्या वतीने ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे नि:शुल्क आयोजन !

पुणे सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता ।’ या संत उक्तीप्रमाणे हिंदूंच्या भयावह अवस्थेचे सत्य वर्णन केल्याबद्दल ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपट निर्मात्यांचे अभिनंदन केले पाहिजे. आज आपण ‘द कश्मीर फाइल्स’ बघतो, उद्या उर्वरित देशवासियांचे असे हाल झाले, तर चित्रपट बनवायला आणि पहायलाही कोण शिल्लक रहाणार नाही. चित्रपटातील महत्त्वाच्या संदेशाप्रमाणे ‘खोटी वार्ता दाखवणे एवढा अपराध नाही, जेवढा खरी वार्ता लपवणे, हा मोठा अपराध आहे’, असे मत हिंदु महासभेचे नेते अभयसिंह इचगांवकर यांनी व्यक्त केले. ते हिंदवी प्रतिष्ठान प्रायोजित कार्यक्रमात बोलत होते. पंढरपूर येथे हिंदु महासभेच्या वतीने ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट नि:शुल्क दाखवण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष बाळासाहेब डिंगरे, पत्रकार महेश खिस्ते, विवेकजी बेणारे यांनी अथक परिश्रम घेतले. चित्रपट समाप्तीनंतर प्रेक्षकांतून जोरदार देशभक्तीपर घोषणा दिल्या गेल्या

श्री. इचगांवकर यांनी मांडलेली अन्य सूत्रे

. अखिल भारतीय हिंदु महासभेने सर्वप्रथम काश्मिरी बांधवांसाठी देहली हिंदुसभा भवनात छावणी उघडली. काश्मीर प्रश्नात सदैव हिंदु महासभेने आवाज उठवला. काश्मीर हिंदु महासभेचे अध्यक्ष पुष्करनाथ कौल सदैव लढत होते; परंतु हिंदु महासभेचे योगदान प्रसारमाध्यमांनी नाकारले. चित्रपटातही दुर्लक्षले. निदान चित्रपटातील पुष्करनाथ पात्रामुळे त्यांची आठवण झाली.

. बर्‍याच हिंदु विरोधींना ‘बुडाला’ या सत्यान्वेषी चित्रपटामुळे मिरच्या झोंबल्या. भगवा आतंकवाद या मिथकाचे उद्गाते, भारताचे भूतपूर्व गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणतात, ‘‘कश्मीर फाइल्स’पेक्षा ‘गुजरात फाइल्स’ बघा.’’ म्हणजे त्यांना

हिंदूंच्या वंशविच्छेदांची काळजी नाही, त्यांच्या सारख्यांनी ‘गुजरात फाइल्स’ आधी ‘गोध्रा फाइल्स’ पाहिल्यास त्यांचे नीट डोळे उघडतील.

. झोपलेल्या भारतवासियांना जागे करण्यासाठी असे चित्रपट अत्यावश्यक आहेत.