परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अध्यात्माविषयीचे मार्गदर्शन
‘बहुतांश हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्य हे शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील आहे. त्यांच्या कार्याला साधनेने मिळणार्या आध्यात्मिक बळाचा काहीच आधार नाही. अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भात बोलतात; पण त्यांच्या लक्षात येत नाही की, हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. साधनेविना ईश्वराचा आशीर्वाद मिळत नाही आणि ईश्वराच्या आशीर्वादाविना काहीच साध्य होऊ शकत नाही. त्यांना ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, असे खरोखरच वाटत असेल, तर ती होण्यासाठी त्यांच्या प्रमुखांनी स्वतः साधना केली पाहिजे आणि कार्यकर्त्यांकडूनही साधना करवून घेतली पाहिजे.
अल्पसंख्यांक असलेले इतर धर्मीय त्यांच्या धर्मानुसार साधना करत असल्याने ते बहुसंख्य हिंदूंना भारी पडतात. हा भारताचा काही शतकांचा इतिहास आहे. तो आता आपल्याला पालटायचा आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.९.२०२१)