सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला झारखंड, गोवा आणि मुंबई (महाराष्ट्र) येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि साधक या सर्वांपर्यंत गुरुमाऊलींची ज्ञानगंगा पोचली. गुरुदेवांची ज्ञानशक्ती आणि संतांचे लाभलेले मार्गदर्शन यांतून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा लाभ घेण्यासाठी समाजातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी, वाचक अन् हितचिंतक मोठ्या संख्येने अभियानात कृतीशील सहभाग घेत आहेत. ‘हा प्रतिसाद पाहून गुरुदेवांची ज्ञानगंगा प्रवाहित होऊन सर्व जण त्या चैतन्यात न्हाऊन निघत आहेत’, अशी अनुभूती सर्वांनी घेतली.
श्रीमती संध्या सिंह, जमशेदपूर, झारखंड.
१. ‘विविध क्षेत्रांतील व्यक्तींना ग्रंथांच्या वितरणाच्या निमित्ताने संपर्क कसा करायला पाहिजे ? त्यांची आवड कोणत्या क्षेत्रांत आहे ? कोणत्या ग्रंथांविषयी सांगितल्यावर त्यांना लाभ होईल ?’, असे ईश्वराला विचारल्यावर तो मला त्याविषयी सुचवत असे.
२. आधी माझ्याकडून नियमितपणे ग्रंथांचा अभ्यास करणे होत नव्हते; परंतु अभियानाची सेवा करतांना माझ्याकडून ग्रंथांचा अभ्यास होऊ लागला. तेव्हा मला वाटायचे, ‘मला ग्रंथातील सूत्रे समजली, तरच मी त्याविषयी इतरांना सांगू शकीन.’
३. पूर्वी व्यक्तींना संपर्क केल्यावर त्यांच्याकडून ग्रंथांची मागणी मिळाली नाही, तर मी अस्वस्थ होत असे; परंतु आता मला वाटते, ‘देवाने माझ्याकडून सेवा करवून घेतली’ आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होते.’
सौ. मनाली भाटकर, गोवा
‘ऑनलाईन साधना सत्संगा’तील जिज्ञासूंनी वाण देण्यासाठी सनातनचे लघुग्रंथ घेणे
१. ‘गोवा येथील साधना सत्संगातील जिज्ञासू सौ. राजश्री तळावलीकर यांना सत्संगात वाणाविषयी माहिती समजल्यानंतर त्यांनी ‘गणपति’ हे लघुग्रंथ घेतले.
२. साधना सत्संगातील जिज्ञासू सौ. पूजा मंगेशकर मागील ६ – ७ वर्षांपासून वाण म्हणून सनातनची सात्त्विक उत्पादने देत असत. सत्संगात वाण म्हणून ग्रंथ भेट देण्याविषयी ऐकल्यानंतर त्यांनी लघुग्रंथ वाण देण्याचे ठरवले. त्यांनी ‘दत्त’ आणि ‘देवीपूजनाचे शास्त्र’ हे लघुग्रंथ विकत घेतले. त्या म्हणाल्या, ‘‘सत्संगात दत्ताविषयी माहिती समजल्यानंतर ‘ही माहिती इतरांनाही मिळावी’, असे मला वाटले. त्यामुळे इतरांचे पूर्वजांचे त्रास दूर होऊन तेही साधनारत होतील.’’
सौ. उर्मिला खानविलकर, वरळी, मुंबई.
१. एरव्ही ग्रंथ घेण्यासाठी टाळाटाळ करणार्या नातेवाईकाला ग्रंथांची माहिती सांगितल्यावर त्याने त्वरित ग्रंथ विकत घेणे
‘मी एका नातेवाईकाला संपर्क केला आणि त्याला सनातनच्या ग्रंथांविषयी माहिती सांगून ‘घराघरांत हे ग्रंथ पोचणे कसे आवश्यक आहे ?’, हे सांगितले. एरव्ही मला ‘नंतर पैसे देतो. नंतर सांगतो’, असे म्हणणार्या त्या नातेवाईकाने ग्रंथांचे पैसे त्वरित आणून दिले. तेव्हा मला आश्चर्य वाटले. ‘हे कार्य भगवंताने आधीच केले आहे. आपल्याला केवळ निमित्तमात्र व्हायचे आहे’, याची मला जाणीव झाली.
२. पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सांगितलेला भावप्रयोग करून वाचकांना ग्रंथांची सूची दाखवल्यावर त्यांनी ‘सनातनचे गुरु महान आहेत’, असे सांगणे आणि त्यांचा भाव जागृत होणे
मी ‘सनातन प्रभात’च्या एका वाचकाला २ वर्षांपूर्वी संपर्क केला होता. त्यानंतर मधल्या कालावधीत मी त्यांना संपर्क केला नव्हता. सनातनच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सांगितलेला भावप्रयोग करून मी त्या वाचकांना संपर्क करण्यासाठी गेले. सेवेला गेल्यावर मी पुढीलप्रमाणे भाव ठेवला, ‘श्रीकृष्ण आपल्या हाताला धरून घेऊन जात आहे. आधीपासूनच तेथे त्याचे चैतन्य पोचले आहे. मी केवळ माध्यम आहे.’ तेथे गेल्यावर मी त्या वाचकांना ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’चा विषय सांगितला आणि ग्रंथांची सूची दाखवली. ती त्यांनी ठेवून घेतली आणि म्हणाले, ‘‘सनातनचे गुरु महान आहेत. तुमच्या रूपाने या घराला गुरूंचा चरणस्पर्श लाभला आहे आणि घरात चैतन्य आले आहे.’’ तेव्हा त्यांचा भाव जागृत झाला आणि त्यांनी हात जोडले. त्या वेळी मला कृतज्ञता वाटली आणि माझी भावजागृती झाली.’
३. कृतज्ञता
परात्पर गुरुदेवांच्या असीम कृपेमुळेच मला ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या सेवेतील आनंद घेता आला’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.