एटीएम् कार्डची चोरी करून लाखो रुपयांची फसवणूक करणारा मुंब्रा येथील धर्मांध अटकेत !

राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पहाणार्‍या धर्मांधांना कठोर शासनच करायला हवे ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, २५ मार्च (वार्ता.) – टपाल कार्यालयाच्या माध्यमातून वितरणासाठी आलेले अधिकोषाचे एटीएम् कार्ड चोरी करून त्या साहाय्याने कार्डधारकाच्या खात्यातील रक्कम काढणार्‍या मुंब्रा येथील मोहंमद तोहीद शेख (वय २२ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी एकूण ८६ एटीएम् कार्ड आणि १ चारचाकी वाहन हस्तगत केले आहे. आरोपीने आतापर्यंत या चोरी केलेल्या एटीएम् कार्डच्या साहाय्याने ५ – ६ लाख रुपये काढले असल्याचे पोलिसांनी सांगितले. (लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक)