रश्मी शुक्ला यांच्या तोंडी आदेशाने ‘फोन टॅपिंग’ केल्याचे पोलीस अन्वेषणात उघड !

पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला

पुणे – गुन्हेगारांच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे ‘फोन टॅपिंग’ केल्याप्रकरणात गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलीस उपायुक्तांची पुणे पोलिसांनी २१ मार्च या दिवशी चौकशी केली. चौकशी करण्यात आलेले पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सातजणांची चौकशी केली असून, त्यात पोलीस उपायुक्तांपासून ते तांत्रिक विश्लेषण विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या तोंडी आदेशाने ‘फोन टॅपिंग’ करण्यात आल्याचे पोलीस अन्वेषणात समोर आले.