स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ‘गतीने होत नाही’, असे वाटत असतांना केवळ परात्पर गुरुमाऊलींच्या चरणांच्या दर्शनाने प्रयत्न करण्याचा निश्चय करणार्‍या सौ. राजश्री तिवारी !

१. प्रक्रिया करतांना अंतर्मुख होता येत नसल्याची खंत वाटणे आणि सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांची आठवण होऊन भावजागृती होणे

मी रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करण्यासाठी आले असतांना १५ दिवस झाले, तरीही माझ्या प्रयत्नांना गती येत नव्हती. मला अंतर्मुख होता येत नव्हते. त्या वेळी मला सद्गुरु स्वातीताईंची पुष्कळ आठवण आली आणि त्यांचे प्रेम आठवून माझी भावजागृती झाली. त्या वेळी ‘माझ्यावरील त्रासदायक आवरण दूर होत असून ‘माझे मन अंतर्मुख होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे’, असे मला वाटले.

सौ. राजश्री तिवारी

२. गुरुमाऊलींच्या चरणांच्या दर्शनामुळे मनाचा निश्चय दृढ होऊन प्रयत्नांत वाढ होणे

१७.९.२०१८ या दिवशी संध्याकाळी आश्रमात कालभैरव यंत्राची पूजा झाली. मी त्या विधींचे प्रक्षेपण पहात असतांना मला पडद्यावर प.पू. गुरुमाऊलींचे चरण दिसले आणि मी भानावर आले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी या चरणांच्या प्राप्तीसाठी पूर्ण वेळ साधना करू लागले; परंतु आता मी काय करत आहे ?’, त्या वेळी ‘या चरणांच्या प्राप्तीसाठी कितीही संघर्ष करावा लागला, तरी चालेल; पण मला या चरणांपासून दूर जायचे नाही’, असा माझा निश्चय झाला.

मी ही सूत्रे लिहीत होते. तेव्हा मला त्या कागदावर दैवी कण दिसले आणि आनंद झाला. ‘गुरुमाऊली, तुमच्या चरणांच्या दर्शनानेच हे शक्य झाले, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. राजश्री तिवारी, सोलापूर (१७.९.२०१८)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक